मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्या, आमदार बबनदादा शिंदे यांची पत्राद्वारे मागणी


मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आपलं उपोषण सुरू केलं आहे. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी, यासाठी त्यांनी अंतरवाली सराटीत उपोषण सुरू केलं आहे.

 विविध राजकीय नेते त्यांच्या भेटीगाठी घेतांना दिसत आहेत. अशातच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे यांनी ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीला पत्र जाहीर करून पाठिंबा दर्शवला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. अशातच बबन शिंदे यांनी ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं, अशी भूमिका त्यांनी आपल्या पत्राद्वारे जाहीर केली आहे. त्यांनी आपल्या पत्रात असं म्हटलंय की, मराठा समाज पुर्वीपासून आरक्षणापासून वंचित असल्याने मराठा समाजातील तरूण-तरूणींना प्रत्येक क्षेत्रामध्ये अडचणींचा सामना करावा लागत आहे. मराठा समाजाच्या तीव्र भावना लक्षात घेता त्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने सरकारने मराठा समाजास आरक्षण देणे आवश्यक आहे.

तसेच मराठा मसाज बांधवाला ओबीसीमध्ये कुणबी मराठा सगे सोयरे या शब्दाचा आंतरभाव करून लाभ मिळण्यासाठी मौजे अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेल्या मराठा समाज आरक्षणाचे जनक मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणासा मी माढा तालुका व माढा विधानसभा मतदारसंघाच्या वतीने जाहीर पाठिंबा देत आहे. असेही त्यांनी आपल्या पत्रात म्हटलंय.

Post a Comment

0 Comments