शेतकऱ्यांला गुन्ह्यात अटक न करण्यासाठी फौजदाराने मागितली लाच, एलसीबीची कारवाई


लातूर |

 शेतातून अपेक्षित उत्पन्न मिळत नसताना शेतकरी कसेतरी शेतीचा खर्च काढून आपला संसाराचा गाडा ओढत असतो. मात्र शेतकऱ्याकडून देखील पैशांची मागणी करत सदरची रक्कम स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षकासह हवालदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. 

लातूर  जिल्ह्यात हि खडबडजनक घटना घडली आहे. सदर घटनेत शेतातील झाड तोडण्याच्या कारणावरून भांडण झालेल्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी शेतकऱ्याकडून २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी पोलीस उपनिरीक्षक दिलीप मोरे यांनी केली होती. मात्र तक्रारदार शेतकऱ्याने याबाबत लातूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. तक्रारीची शहानिशा करून पथक नेमून सापळा रचण्यात आला. 

दरम्यान ठरल्यानुसार पोलीस उपनिरीक्षक मोरे व सह पोलीस हवालदार पांडुरंग दाडगे यांनी तक्रारदार शेतकऱ्याकडून २० हजाराची लाचेची रक्कम स्वीकारली. याचवेळी लातूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दोघांना रंगेहात पकडले आहे. या दोघांनाही आता एसीबीने अटक केली असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments