तर शेतकरी सरकारचा कडेलोट करतील - शेतकरी संघटना प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड


बार्शी |

वारंवार शांततेच्या मार्गाने आंदोलने करून सुद्धा सरकार झोपेचं सोंग घेऊन जर शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करणार नसेल तर मात्र शेतकरी सरकारचा पराभवाच्या खाईत कडेलोट केल्याशिवाय गप्प बसणार नाहीत असा खणखणीत इशारा आमच्या प्रतिनिधीशी बोलताना शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड यांनी बार्शी तहसील समोर झालेल्या आंदोलनाप्रसंगी दिला.

 त्यावेळी शेतकरी संघटनेचे युवा तालुका अध्यक्ष शरद भालेकर, लोकप्रतिष्ठा विचारमंचचे अध्यक्ष राहुल भड, संभाजी ब्रिगेडचे आनंद काशीद, अशोकराव माळी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रामराव काटे, मनोज जरांगे पाटील संघटनेचे विनायक घोडके, जनहित शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मुठाळ, रयत क्रांती संघटनेचे रामहरी पेजगुडे आदींनीही मनोगत व्यक्त केले. त्यावेळी समाधान पाटील, अभिजीत शिंदे, संजय कोंढारे, राजेंद्र पाटील, तुकाराम सातपुते, अनिल गावसाने, अभिषेक पाटील, अक्षय पाचकवडे, काशिनाथ उमाटे आदींसह बहुसंख्य शेतकरी सहभागी झाले होते. सन 2023 खरीप व रब्बीचा राहिलेला पिकविमा द्या, येलोमोजाईक व दुष्काळाची उर्वरित नुकसान भरपाई द्या, मागील थकीत कांदाअनुदान व थकित ऊसबिले तात्काळ अदा करा आदी मागण्यासाठी हे आंदोलन विविध संघटनांच्या वतीने करण्यात आले.
    
बार्शीचे तहसीलदार एफ.आर. शेख यांनी सायंकाळी पाच वाजता आंदोलकांना लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले, तर या आंदोलनाचा चोख पोलीस बंदोबस्त बार्शी शहर पोलीस स्टेशनच्या वतीने ठेवण्यात आलेला होता.

Post a Comment

0 Comments