महाराष्ट्र विद्यालयात नवीन विद्यार्थ्यांचे ढोल ताशा वाजवून स्वागत


महाराष्ट्र  विद्यालय बार्शी मध्ये इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी मध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे ढोल ताशा वाजवत त्यांचे स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संस्थेचे सचिव पी.टी. पाटील हे होते सोबत संस्थेचे खजिनदार जयकुमार शितोळे होते.

प्रथम छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती के.डी.धावणे यांनी केले. यानंतर कार्यक्रमात सर्व मान्यवरांच्या हस्ते नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प व पुस्तके देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच प्रतिनिधिक स्वरूपात काही पालकांचा देखील गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

या नंतर संस्थेचे खजिनदार श्री जयकुमार शितोळे यांनी विद्यार्थ्यांना मानसिक स्वास्थ विषयी मार्गदर्शन केले.
यानंतर संस्थेचे सचिव पी.टी. पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी शाळेतील आपले वर्तन कसे असावे याबद्दल सखोल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रम प्रसंगी विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती के.डी.धावणे, मुख्याध्यापक आर.बी.सपताळे, विद्यालयाचे पर्यवेक्षक सी. महामुनी, पर्यवेक्षिका श्रीमती एन.बी.साठे , अनिल पाटील, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.‌या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कसबे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती एन.बी.साठे यांनी केले.

Post a Comment

0 Comments