महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार?; ‘इतके’ आमदार शरद पवारांकडे परतणार?


 लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार असल्याचं दिसतंय. कारण अजित पवार गटातले आमदार पुन्हा शरद पवारांकडे परतण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवारांसोबत असलेल्या 10 ते 12 आमदारांनी सुप्रिया सुळे यांना अभिनंदनाचा संदेश दिला. या संदेशाच्या मार्फत पक्ष वापसीसाठी या आमदारांकडून प्रयत्न केला जात आहे. 10 आमदार परतीसाठी संपर्क करत असल्याची माहिती समोर आली आहे.

शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांनी मोठा दावा केला आहे. अजित पवारांच्या गटातील 18 ते 19 आमदार हे शरद पवारांच्या संपर्कात आहेत, असं दावा रोहित पवार यांनी केला आहे.

अजित पवारांचे 19 आमदार शरद पवाराच्या  संपर्कात असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. तर त्यांच्या गटातील इतर 12 आमदार हे भाजपाच्या संपर्कात आहेत. ते काय करतील ते पुढच्या काही दिवसांत आपल्याला समजेल, असं रोहित पवार म्हणाले.

19 आमदारांपैकी कोणाला आमच्या पक्षात घ्यायचं आणि कोणाला घ्यायचं नाही हा निर्णय आमचे पक्षप्रमुख घेतील. जे लोक स्वतःच्या फायद्यासाठी पक्ष सोडून गेले त्या लोकांना, तसेच ज्यांना भाजपने मारून-मुटकून, अडचणीत आणून तिकडे नेलं असेल त्यांना प्राधान्य द्यावं. असं आम्हा सर्व कार्यकर्त्यांना वाटतं, असंही रोहित पवार म्हणाले.

राष्ट्रवादीला फक्त एका जागेवर यश दरम्यान, लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त एका जागेवर यश मिळालं. रायगडमधून सुनिल तटकरे यांचा विजय झाला तर उरलेल्या तीनही जागांवर राष्ट्रवादीला पराभवाचा सामना करावा लागला.

बारामतीच्या हाय व्होल्टेज लढतीमध्ये सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने महाराष्ट्रात 10 जागा लढवून 7 जागांवर विजय मिळवला.

Post a Comment

0 Comments