करमाळा |
करमाळा तालुक्यातील वर्ग दोन जमीनीच्या उताऱ्यावरील पोट खराब नोंदीमुळे शेतकऱ्यांना पिक विमा सवलतीसाठी अडचणी येत होत्या या संदर्भात या क्षेत्राची वहीत नोंद करण्याबाबत रश्मी बागल यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन मागणी केली असून संबंधितांना मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना महसूलमंत्र्यांनी दिल्या आहेत.
करमाळा तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतकरी वहिवाटी करत असलेल्या जमिनीच्या सातबारा वर वर्ग दोन व पोट खराब अशा नोंदी असल्याने संबंधित शेतकऱ्यांना पिक विमा काढण्यासाठी अडचण होती अनेक शेतकऱ्यांना यामुळे पिकविमा लाभांपासून वंचित राहण्याची वेळ येत होती या प्रश्नाबाबत भाजपा महिला प्रदेश कमिटीच्या उपाध्यक्ष रश्मी बागल यांनी काल महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन यासंबंधी निवेदन महसूलमंत्र्यांना दिले असून त्यांनी या संदर्भात मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांना दिल्या आहेत. रश्मी बागल यांची भाजपाच्या महिला प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी तालुक्यातील विविध प्रश्न सोडविण्याचा धडाका लावला असून. तालुक्यातील लोकांच्या विविध अडचणी संदर्भात मंत्रालय पातळीवर पाठपुरावा करून या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत याबरोबरच तालुक्यातील विविध भागांमध्ये कार्यकर्त्यांच्या मेळाव्याच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न दिग्विजय बागल करत आहेत या मेळाव्यांना जनतेतून चांगला प्रतिसाद मिळत असून यावरून येत्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या माध्यमातून बागल गटाने जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे.
करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उताऱ्यावरील पोट खराब नोंदीमुळे पीक विम्यासाठी अडचणी येत असल्याने या क्षेत्राची वहीत नोंद करण्यासंदर्भात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन देताना रश्मी बागल.
0 Comments