तुझ्या बहिणीचे माझ्याशी लग्न लावून दे, अन्यथा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी


बार्शी |

२०२२ मध्ये पीडिता बार्शी येथे कॉलेजमध्ये शिकत असताना पीडितेच्या ओळखीच्या एका युवकाने लातूर येथे लॉजवर पीडितेवर दुष्कर्म करून त्याचा व्हिडीओ बनवून तो दुसऱ्या व्यक्तीस दिला.


त्या व्यक्तीने पीडितेला तुझ्या लहान बहिणीशी माझे लग्न लावून दे, नाही तर तो व्हिडीओ व्हायरल करीन, अशी धमकी दिली आहे. याबाबत पीडितेने त्या दोघांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

ईश्वर मस्के (रा. लातूर) व प्रतीक सचिन दहिवाळ (रा. पिसादेवी मंदिराजवळ, संभाजीनगर, जि. संभाजीनगर) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पीडिता ही बार्शी येथे शिकत असताना तिची ओळख ईश्वर मस्के याच्याशी झाली. ईश्वर मस्के याने सन २०२२ मध्ये लातूर शहरातील बस स्टँडजवळील लॉजमध्ये नेऊन बळजबरीने दुष्कर्म केले व दरम्यान तिचे फोटो काढले. ते फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच संशयित आरोपी प्रतीक याने ३१ ऑगस्ट २०२३ रोजी रक्षाबंधननिमित्त फिर्यादी पीडितेच्या घरी जाऊन माझ्याकडे तुझा नग्न व्हिडीओ आहे, तो मी ईश्वर मस्के याच्याकडून पैसे देऊन विकत घेतला असल्याचे सांगितले. तू माझे लग्न तुझी लहान बहीण, हिच्याशी लावून दे, नाहीतर तुझा नग्न व्हिडीओ व्हायरल करेन, अशी धमकी प्रतीक दहिवाळ हा पीडितेस देत असल्याने मानसिक त्रासाला कंटाळून पीडितेने यातील ईश्वर मस्के व प्रतीक दहिवाळ या दोघांच्या विरूध्द बार्शी पोलिसात तक्रार दिली आहे.

Post a Comment

0 Comments