मंत्रीपदासाठी अजित पवार गट अजूनही वेटिंगवरच?; समोर आलं मोठं कारण


 नरेंद्र मोदी आज दिल्लीत तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. मोदींच्या मंत्रीमंडळात महाराष्ट्रातील 6 जणांना संधी मिळाली आहे. यामध्ये शिंदे गटाच्या एका खासदाराचा समावेश आहे. पण, अजित पवार गटाला एकही मंत्रीपद मिळणार नसल्याची सध्या जोरदार चर्चा आहे.

यासंदर्भात सुनील तटकरेंच्या घरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देखील दिली होती. राष्ट्रवादीच्या नेत्यांची फडणवीसांकडून समजूत काढण्याचे प्रयत्न झाल्याची चर्चा आहे. पाहायला गेलं तर, अद्याप याबाबत अधिकृत अशी कोणतीच माहिती समोर आलेली नाहीये. पण, सकाळपासूनच अजित पवार गट चर्चेत आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिल्लीत तळ ठोकूनही त्यांना संधी देण्यात आली नाही. अजित पवार गटाकडून सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल इच्छुक उमेदवार होते. मात्र प्रफुल पटेल यांच्या  नावाची जोरदार चर्चा होती. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नेत्यांच्या दिल्लीत पार पडलेल्या बैठकीत प्रफुल पटेल यांच्या नावावर राष्ट्रवादीकडून शिक्कामोर्तबही करण्यात आलं होतं.

सकाळी महाराष्ट्रातून ज्यांना संधी देण्यात आली, त्यांना फोन करण्यात आले. पण, राष्ट्रवादीला अद्यापही फोन आला नसल्याची माहिती आहे. एकीकडे शिंदे यांच्या शिवसेनेचे सात खासदार असूनही त्यांना केवळ 1 राज्यमंत्रीपद मिळत आहे. तर, केवळ 1 खासदार असलेल्या राष्ट्रवादीला कॅबिनेट कसं द्यायचं?, याबाबत प्रश्न निर्माण झाल्याचं समोर आलंय.

Post a Comment

0 Comments