बार्शी तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय इमारत बांधकाम करण्यासाठी ५ कोटी ५० लाख रूपये मंजूर


आमदार राजेंद्र राऊत यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीच्या इमारत बांधकामास ५ कोटी ५० लाखाच्या निधीस मंजुरी..

राज्यातील ज्या ग्रामपंचायतींना स्वतःच्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत नाही अशा ग्रामपंचायतींना स्वतंत्र कार्यालयाची इमारत बांधण्यासाठी "मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना संदर्भात शासन निर्णयान्वये मंजूर करण्यात आली आहे. ग्रामीण भागासाठी पायाभूत सुविधांची असणारी आवश्यकता व त्यासाठी उपलब्ध असणाऱ्या स्रोतांची मर्यादा विचारात घेऊन शासन निर्णयान्वये मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजने अंतर्गत बोरगांव (झा)२० लाख,वानेवाडी २० लाख,कापशी२० लाख,खडकोणी२० लाख,पूरी २० लाख,रस्तापूर २० लाख,खडकलगांव २० लाख, पिंपरी (आर)२० लाख,आळजापूर २० लाड,गाताची वाडी २० लाख, कासारी २० लाख,कळंबवाडी (पा)२० लाख,हत्तीज २० लाख, महागाव २० लाख,पांढरी २० लाख, सावरगाव २० लाख, ममदापूर २० लाख,कुसळंब २० लाख,वांगरवाडी/तावरवाडी २० लाख,झाडी २० लाख,धामणगाव दु २५ लाख,नारी २५ लाख,पिंपरी (पा)२५ लाख,राळेरास २५ लाख,शेळगाव (आर) ५ लाख,पिंपरी पान २५ लाख आदी ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी ५ कोटी ५० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

बार्शी तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालयांसाठी निधी मिळावा म्हणून आमदार राजेंद्र राऊत यांनी महाराष्ट्र शासनाकडे सतत पाठपुरावा केला होता,त्यानुसार वरील ग्रामपंचायत कार्यालय इमारतींसाठी निधी उपलब्ध झाला असून लवकरच सदर ग्रामपंचायतींच्या सुसज्ज इमारती उभ्या राहणार आहेत.

सदरील कामासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व ग्रामविकास मंत्री गिरीशजी महाजन यांचे आमदार राजेंद्र राऊत यांनी बार्शी तालुक्याच्या वतीने व नागरिकांच्या वतीने जाहीर आभार मानले.

Post a Comment

0 Comments