“मोदींहून सुप्रिया सुळेंना अधिक लीड”; पवारांनी मोदींना डिवचलं

बारामतीच्या लढतीत राज्याचे माजी कृषिमंत्री आणि खासदार शरद पवार यांनी आपल्या लेकीची तुलना ही थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत केली आहे. शरद पवार बोलत असताना मोदी सरकारवर हल्लाबोल केला. तसेच मोदींच्या गॅरंटीवर देखील भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, देशाचे पंतप्रधान हे दीड लाख मतांनी निवडून आले आहेत. तसेच तुमचा उमेदवार हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींपेक्षा जास्त मतांनी निवडून आला, असं म्हणत शरद पवारांनी मोदींना मिश्कील टोला लगावला.

“मोदींहून सुप्रिया सुळेंना अधिक लीड”
पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकसभा निवडणुकीत बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळेंहून कमी मतं मिळाली आहेत. त्यावर शरद पवारांनी भाष्य करत नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे. शरद पवार म्हणाले की, नरेंद्र मोदी हे दीड लाख मतांनी विजयी झाले आहेत. तसेच बारामतीकरांनी सुप्रिया सुळेंना 1 लाख 80 हजार लीडने विजयी केलं असल्याचं म्हणत शरद पवारांनी मोदींना टोला लगावला आहे.

शरद पवार हे बारामतीत गेल्या तीन दिवसांपासून दुष्काळ दौरे करत आहेत. ते बारामती तालुक्यातील गावांमध्ये जात सभा घेत आहेत. ते विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाण्याच्या प्रश्नावर भाष्य करत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते तालुक्यातील गावांचा दौरा करत आहेत.

खासदार सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार, उत्तम जाणकर हे देखील शरद पवारांसोबत आहेत. या दौऱ्या दरम्यान शरद पवारांनी बारामती लोकसभा मतदारसंघावर भाष्य केलं आहे. त्यावेळी नरेंद्र मोदींवर देखील निशाणा लगावला आहे. शेतकरी अडचणीत कसा येईल, याचा विचार मोदी सरकार करतं. मोदी सरकारमधील लोकं म्हणतात. आम्ही खाणारे लोकांना विचारतो. परंतु पिकवणाऱ्याने पिकवलंच नाहीतर खाणारा काय खाईल. सत्ताधाऱ्यांनी काळ्या आईशी इमान राखणाऱ्या लोकांचा विचार केला पाहिजे, असं शरद पवार म्हणाले आहेत.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींनी मोदींची गॅरंटीच्या नावाखाली प्रचार केला. पण ही नरेंद्र मोदींची गॅरंटी खरी नसून लोकांची गॅरंटी खरी आहे. यावेळी बोलत असताना त्यांनी यवतमाळमधील शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने कर्जमाफीचा एक किस्सा सांगितला. ते म्हणाले की, यवतमाळच्या एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. त्यावेळी मी अस्वस्थ झालो. त्यावेळी मी 75 हजार कोटी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी केली, असं शरद पवार म्हणाले आहेत.

शरद पवार यांनी बारामतीच्या लाटे, पणदरे, काटेवाडी, लोणी भापकर या गावांमध्ये जात ग्रामस्थांना भेटी दिल्या आणि ग्रामस्थांच्या समस्या देखील जाणून घेतल्या आहेत. यावेळी बोलत असताना त्यांनी जमिनी न विकण्याचं आवाहन केलं आहे. ते म्हणाले की, मी पाणी आणतो पण कृपा करून काहीही करा पण जमिनी विकू नका आपण त्यातून मार्ग काढू, असं शरद पवारांनी बारामतीच्या ग्रामस्थांना आवाहन केलं आहे.

Post a Comment

0 Comments