बार्शी | घारी येथील फटाक्याच्या कारखान्याला आग, वटपौर्णिमेमुळे अनर्थ टळला


बार्शी तालुक्यातील घारी गावापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या फटाक्याच्या कारखान्यात शुक्रवारी सकाळच्या सुमारास मोठा स्फोट झाला. या घटनेत कोणत्याही प्रकारची जिवितहानी झाली असून ४० लाखांचे फटाके जळून भस्मसात झाल्याची प्राथमिक माहिती पांगरी पोलिसांनी माध्यमांशी बोलताना दिली.

दरम्यान, बार्शी तालुक्यातील कुसळंब गावापासून सहा किलोमीटर अंतरावर घारी (ता.बार्शी) हे गाव आहे. या गावातील शिवारातील युन्नूस मुसाभाई मुलाणी यांच्या फटाक्या कारखान्यास सकाळी १० वाजता अचानक आग लागून स्फोट झाला. सहा किलोमीटर अंतरावर स्फोटाचा हादरा बसला. रोज घारीसह आसपासच्या परिसरातील १५ महिला मजूर काम करत असतात, परंतु पाऊस व वटपौर्णिमा असल्यामुळे दोन दिवसांपासून वेलकम फायर वर्क्स कारखाना बंद असल्यामुळे जिवीत हानी झाली नाही. 

Post a Comment

0 Comments