दिलीप सोपल कोणत्या पक्षाच्या चिन्हावर लोकसभा निवडणूक लढवणार?बार्शी |

दिलीप सोपल सोलापूरच्या राजकारणातील दिलखुलास व्यक्तिमत्व. अगदी हसत खेळत कोणाचा गेम कसा करायचा?, हे माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या भाषणातूनच शिकावे. त्यांचे भाषण म्हणजे अगदी मैफिलच असते.

आता तेच सोपल पाच वर्षांच्या मोठ्या ब्रेकनंतर लोकसभा निवडणुकीत सक्रिय झाले होते. धाराशिवचे ठाकरेंचे शिलेदार ओमराजे निंबाळकर यांच्यासाठी त्यांनी प्रचाराचा धडाका लावताना विरोधकांचा त्यांनी आपल्या खास शैलीत समाचार घेतला. आता हेच सोपल विधानसभा लढवणार का?. लढवली तर कोणत्या पक्षाकडून?, याची चर्चा रंगली आहे. माझा पक्ष शरद पवार असे नेहमी सांगणारे सोपल विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवारांची 'तुतारी' हाती घेतील का?, अशी कुजबूज बार्शीच्या राजकीय आखाड्यात सुरू झाली आहे.

सोलापूर जिल्हा तीन लोकसभा मतदारसंघात विभागला गेला आहे. सोलापूर मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदासंघ हे जिल्ह्यातील आहेत. माढा लोकसभा मतदारसंघातील माण-खटाव आणि फलटण हे दोन मतदारसंघ सातारा जिल्ह्यातील आहेत. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुका हा धाराशिव लोकसभा मतदारसंघाला जोडला गेला आहे. याच बार्शीत लोकसभेचे धुमशान नुकतेच घडून गेले.

Post a Comment

0 Comments