देवेंद्र फडणवीसांनंतर राज्याचे नवे उपमुख्यमंत्री गिरीश महाजन असणार??


राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपला अधिक जागा जिंकण्यास यश आलेले नाही. यामुळे महाराष्ट्रात झालेल्या पराभवाचे जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी स्वीकारली आहे. या त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याबाबत ही इच्छा व्यक्त करून दाखवली आहे. भाजपकडून फडणवीसांची समजूत काढण्याचे अनेक प्रयत्न होत असतानाही फडणवीस आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पण नेमके कोणाकडे जाईल याबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात आहेत.

अशातच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस नंतर उपमुख्यमंत्री पद नेते गिरीश महाजन यांना मिळू शकते, अशी माहिती समोर आली आहे. कारण की, गिरीश महाजन हे भाजपमधील एक संयमी नेते आहेत. त्यांचे सर्व पक्षाच्या नेत्यांसोबत चांगले संबंध देखील आहेत. त्यामुळे पुढे जाऊन गिरीश महाजनांना उपमुख्यमंत्री बनवले तर इतर पक्षांसोबत देखील भाजपला चांगले संबंध राखून ठेवता येतील. असे काही झाल्यास याचा मोठा फायदा निवडणुकीमध्ये भाजपला होईल.

दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी राजीनाम्याबाबत वक्तव्य केल्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांना दिल्लीला बैठकीसाठी बोलवले होते. या बैठकीमध्ये बराच वेळ आम्ही शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली. तसेच, विधानसभा निवडणुकीसाठी आखलेल्या प्लॅनची ब्लू प्रिंट ही त्यांना दाखवली. त्यानुसार, विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजप लवकरच जनादेश यात्रा काढणार आहे. या यात्रेचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस करताना दिसतील. पुढील काळात फडणवीस यांनी विधानसभेची कामे हाती घेतली तर त्यांची ही जागा गिरीश महाजन भरून काढतील.

Post a Comment

0 Comments