जर तुम्ही इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले असेल आणि सरकारी नोकरी करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे.
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये तब्बल ४३५ जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरतीसाठीची अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
ज्या अंतर्गत इंजिनिअर ट्रेनी पदाच्या ४३५ रिक्त जागा भरल्या जातील, यासाठी उमेदवार ४ जुलै २०२४ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. पण, या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी आवश्यक वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, नोकरीचे ठिकाण आणि अर्ज फी संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊ…
पदाचे नाव व रिक्त जागा
१) इलेक्ट्रिकल – ३३१
२) सिव्हिल – ५३
३) इलेक्ट्रॉनिक्स – ३७
४) कॉम्प्युटर सायन्स – १४
शैक्षणिक पात्रता
१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून संबंधित शाखेतून पूर्णवेळ B.E./ B.Tech/ B.Sc (Engg.) किमान 60% गुणांसह किंवा समतूल्य CGPA.
२) GATE 2024 परीक्षेत अपेक्षिक गुण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा :
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामधील रिक्त पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत १८ ते २८ वर्षेपर्यंत असावी. यात एसटी आणि एससी प्रवर्गातील उमेदवारांना पाच वर्षे, तर ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना तीन वर्षांची सूट देण्यात आली आहे.
अर्ज फी :
◆ खुला/ ओबीसी/ EWS – ५०० रुपये.
◆ मागासवर्गीय/ ST/PWD/ ExSM – फी नाही.
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतभर
वेतन
४० हजार रुपये ते १ लाख ४० हजार रुपयांपर्यंत (त्यातही अनेक गोष्टींचा समावेश आहे.)
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – ४ जुलै २०२४
१) अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
PGCIL Recruitment 2024
२) ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
https://careers.powergrid.in/recruitment-nextgen
३) अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
http://www.powergrid.in
0 Comments