दूरसंचार विभागामार्फत 75000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी..


संचार मंत्रालयांतर्गत नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी चांगली बातमी आहे. दूरसंचार विभागामार्फत ‘NCCS रिसर्च असोसिएट स्कीम’ अंतर्गत रिसर्च असोसिएटच्या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागणार आहे. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 17 जून 2024 आहे.

पदाचे नाव रिसर्च असोसिएट

शैक्षणिक पात्रता
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (PDF) जाहिरात वाचावी.

वयोमर्यादा
▪️पदवीधर उमेदवारांसाठी 28 वर्षे 
▪️पदव्युत्तर उमेदवारांसाठी 30 वर्ष
▪️पीएचडी उमेदवारांसाठी 35 वर्षे आहे.

पगार
जो उमेदवार निवडला जाईल, त्याला दरमहा पगार म्हणून 75,000 रुपये दिले जातील. निवडलेल्या उमेदवारांना समितीने स्वीकारल्याप्रमाणे अतिरिक्त लाभ आणि भत्ते देखील मिळतील.

अर्ज प्रक्रिया ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता
अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी संबंधित कागदपत्रांसह अर्ज डाउनलोड करून ADET (AC & HQ), रूम 301, नॅशनल सेंटर फॉर कम्युनिकेशन्स सिक्युरिटी, दुसरा मजला, सिटी टेलिफोन एक्सचेंज, संपंगीराम नगर, येथे पाठवावा. बंगलोर – 560027 वर पाठवावे लागेल.

अर्जची शेवटची तारीख
17 जून 2024

अधिकृत संकेतस्थळ
http://dot.gov.in/

Post a Comment

0 Comments