बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ‘या’ पदांसाठी भरती; 10 वी पासही करू शकतात अर्ज


बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. लिपिक पदासाठी बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. यासाठी अर्जदार हा केवळ 10 वी पास असला तरीही हरकत नाही. लिपिक पदासाठी गलेलठ्ठ पगार देण्याचा निर्णय बँक ऑफ महाराष्ट्रने घेतला आहे. यासाठी विशिष्ट वयोमर्यादा देखील दिली आहे. यासाठी अर्जदार ऑनलाईन स्वरूपात अर्ज करू शकतात. यासाठी अर्ज प्रक्रिया कशी करावी याची सोपी पद्धत जाणून घेऊया.

बँक ऑफ महाराष्ट्राकडून ही भरती राबवण्यात आली आहे. अर्ज भरण्याची सुरूवात ही 20 जून 2024 रोजी सुरू झाली आहे. तर अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही 8 जुलै 2024 आहे. यासाठी आपल्याला अर्ज प्रक्रिया करावी लागणार आहे. उशीरा केलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. ही भरती प्रक्रिया एकून 12 पदांसाठी आहे.

संकेतस्थळाला भेट देत भरतीबाबत माहिती मिळवा
यासाठी शिक्षण हे दहावी पास असावं. तसेच भरती प्रक्रियेसाठी वय वर्षे हे 18 ते 25 वर्षे असावं. त्याचप्रमाणे या भरती प्रकियेत लिपिक पदाच्या उमेदवारांना 24050 ते 64480 वेतन दर महिन्याला मिळू शकतो. यासाठी आपण ऑफलाईन पद्धतीने देखील अर्ज करू शकता. bankofmaharashtra.in या संकेतस्थळावर जाऊन भरती प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती मिळवावी.

भरतीसाठी आवश्यक अर्ज देखील याच साईटवर मिळेल. कागदपत्रे आणि भरलेले अर्ज उमेदवारांना महाव्यवस्थापक एचआरएम, बँक ऑफ महाराष्ट्र एचआरएम विभाग, मुख्य कार्यालय, लोकमंगल 1501, शिवाजीनगर, पुणे या पत्त्यावर पाठवावा लागेल. भरती अर्ज भरण्याआधी उमेदवारांनी व्यवस्थित अधिसूचना वाचून घ्यावी.

Post a Comment

0 Comments