Summer Tips- उन्हाळ्यात थंड की गरम पाण्याने आंघोळ करावी?



उन्हाळ्यात थंड पाण्याने आंघोळ केल्याने उष्मा जाणवत नाही. पण काहींना मात्र गरम पाण्याने आंघोळ करण्याची सवय असते. त्यातच सध्याच्या कडाक्याच्या उन्हामुळे नळालाही गरम पाणी येतयं. यामुळे जर तुम्हीही याच पाण्याने आंघोळ करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण गरम पाण्याने आंघोळ करून तुम्ही बाथरुम बाहेर येईपर्यंत घामाने तुम्ही चिंब भिजलेले असता. पण तुम्हाला माहित आहे का गरम पाण्याने त्यातही विशेष उन्हाळ्यात गरम पाण्याने आंघोळ केल्याने आरोग्यावर गंभीर परिणाम होतात.

- गरम पाण्याने डोक्यावरून आंघोळ केल्यास केस गळण्याचा धोका असतो.
- तर त्वचाही भाजू शकते. कारण या दिवसात शरीराचे तापमान वाढलेले असते.
- नाकात गरम पाणी गेल्यास श्लेष्मल त्वचा भाजते, गरम पाणी कानात गेल्यास कान दुखू लागतो.
- महिलांमध्ये मासिक पाळीदरम्यान त्रास होऊ शकतो.
- गरम पाण्यामुळे लघवीला संसर्ग होऊ शकतो.
- लघवी करताना जळजळ होऊ शकते.
- गरम पाण्याने आंघोळ केल्यावर घाम आल्याने अशक्तपणा येतो.
- काही वेळा या थकवा येणे किंवा इतर उष्णतेचे आजारही होऊ शकतात.

Post a Comment

0 Comments