जिल्हा परिषद शाळा सिरसावचा शंभर टक्के निकाल, दिव्या वायकुळे हिने मिळवला प्रथम क्रमांक


सिरसाव |

दहावीचा निकाल २७ मे रोजी जाहीर झाला असून जिल्हा परिषद शाळा सिरसाव ता.परांडा या शाळेचा सन २०२३-२४ चा १००% निकाल लागला आहे. या परीक्षेमध्ये दिव्या दत्तात्रय वायकुळे हिने ९४.०० टक्के मिळवत प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर श्वेता सुधीर पाटील ९२.६० टक्के व स्नेहल गणेश चोबे ८७.४० टक्के  यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. 

जिल्हा परिषद शाळा सिरसाव येथील २३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यामध्ये सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष प्राविण्यसह १४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर प्रथम श्रेणीमध्ये आठ विद्यार्थी असून १ विद्यार्थी हा द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाला आहे. मुख्याध्यापक बी.के. बन व सहशिक्षक राजाभाऊ मिसाळ यांनी अभिनंदन केली आहे. या सर्व विद्यार्थ्यांची खाजगी क्लासेस मधून निलेश चोबे यांनी विशेष तयारी करून घेतली होती.

Post a Comment

0 Comments