कष्टकरी कामगारामुळेच महाराष्ट्र प्रगतीपथावर; आमदार राजेंद्र राऊतसोलापूर |

१ मे महाराष्ट्र दिनानिमित्त तहसील कार्यालय, बार्शी येथे झेंडावंदन कार्यक्रम आमदार राजाभाऊ राऊत यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

आमदार राजाभाऊ राऊत यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की,संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात ज्या लोकांनी बलिदान केले त्यांचे बलिदान न विसरता येण्यासारखे आहे.या संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात कोट्यावधी कामगारांनी सहभाग घेतला.ज्यांच्या कष्टामुळे महाराष्ट्र प्रगतीपथावर आहे त्या सर्व कामगारांना शुभेच्छा.

यावेळी तहसीलदार एफ.आर.शेख,अप्पर तहसीलदार वृषाली केसकर,नायब तहसीलदार बदे साहेब, निवडणूक नायब तहसीलदार संजीवन मुंढे,अव्वल कारकून आर.एन.घोळवे, आर.एस.धनवडे,एन.डी.लांडगे,पुरवठा निरीक्षक सतिश जोशी तसेच प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते..

Post a Comment

0 Comments