धाराशिव |
उस्मानाबाद लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारादरम्यान उमरगा येथे 5 मे रोजी धाराशिवचे माजी खासदार रवींद्र गायकवाड यांनी मुस्लिम समाजाबद्दल आक्षेपार्य शब्द वापरून समाजाची भावना दुखवल्या आहेत. कारवाई करण्यात यावी यासाठी जिल्हाभरातून प्रशासन विभागाकडे निवेदन देण्यात येत होते.
तसेच धाराशिव शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने पोलीस अधीक्षक यांना देखील निवेदन देण्यात आल होते. धाराशिव शहर पोलीस ठाण्यामध्ये मसूद शेख यांच्या तक्रारीवरून 11 मे रोजी माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता 1860 च्या धारा( ए ) 500, 501, नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
0 Comments