लोकसभेनंतर राष्ट्रवादीत मोठा भूकंप घडणार, अजित दादांचा खास माणूस पवारांच्या भेटीला


मुंबई |

गेल्या वर्षभरात राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या. सुरुवातीला एकनाथ शिंदे आणि नंतर अजित पवार यांनी भाजपसोबत जाऊन अनेकांना धक्का दिला. यानंतर आता लोकसभा निवडणुकीत ते एकत्र सामोरं जात आहेत.

लोकसभा निवडणुकीत राज्यातील शेवटच्या टप्प्यातील मतदान २० मे रोजी होत आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहेत. अशातच आता नाशिकमध्ये वेगळ्याच घडामोडी सुरु असल्याची चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा मुक्काम असलेल्या हॉटेलमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे येऊन गेले.

यामुळे एकच चर्चा सुरू झाली आहे. त्यांची शरद पवारांसोबत भेट झाली का याबद्दलची भूमिका अद्याप तरी समोर आलेली नाही. तटकरे येऊन गेल्याच्या वृत्ताला माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दुजोरा दिला आहे. राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर देशमुख शरद पवारांसोबतच राहिले आहेत.

Post a Comment

0 Comments