‘फेक बेबी बंप’ म्हणत दीपिकाला ट्रोल करणाऱ्यांना पती रणवीरने चांगलंच सुनावलं


अभिनेत्री दीपिका पादुकोण  ही तिच्या प्रेग्नंसीसाठी सध्या चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांआधी दीपिका आणि रणवीर कपूर हे दोघेही एअरपोर्टवर स्पॉट झाले होते. त्यावेळी दीपिकाचा बेबी बंप दिसत नव्हता. त्यामुळे काही नेटकऱ्यांनी सरोगसी पद्धतीने दीपिका मुल जन्माला घालणार असल्याचं बोललं गेलं. त्यानंतर दीपिका आणि रणवीर हे दोघेही आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मतदानाला गेले. तेव्हा दीपिकाला फेक बेबी बंपवरून ट्रोल करणाऱ्यांना पती रणवीरने चांगलाच मिश्कील टोला लगावला आहे. 

रणवीरने आपल्या इंस्टाग्रामवर दीपिकाचे फोटो शेअर केले होते. तेव्हा दीपिकाने माय सनशाईन असं लिहिलं होतं. या फोटोंमध्ये दीपिकाने पिवळ्या रंगाचा ड्रेस घातलेला दिसत आहे. त्यापुढील फोटोवर रणवीरने लिहिलं की, ‘उफ्फ! क्या करू मैं? मर जाऊ?’ तर दीपिकाच्या शेवटच्या फोटोवर त्याने लिहिलं की, ‘बुरी नजर वाले, तेरा मुँह काला!’ रणवीरची ही शेवटची कमेंट्स ट्रोलर्ससाठी असल्याचं म्हटलं जात आहे.

Post a Comment

0 Comments