रोहित शर्मा मुंबई इंडियन्स संघ सोडणार?; माजी क्रिकेटपटूचं भाकीत


देशात आयपीएलचा १७ वा हंगाम सुरू आहे. क्रिकेट चाहते आयपीएलचा मनमुरादपणे आनंद लुटताना दिसत आहेत. आयपीएलमध्ये कडवी टक्कर पाहायला मिळत आहे. प्लेऑफसाठी करो या मरोची परिस्थिती पाहायला मिळत आहे. यंदाच्या आयपीएल हंगाम २०२४ मधून मुंबई इंडियन्सला बाहेर जावं लागलं आहे. याला संघनायक हार्दिक पांड्या जबाबदार असल्याचं समजतंय.

रोहित शर्माचं कर्णधारपद काढून पांड्याला मुंबई इंडियन्स संघाचं कर्णधार पद देण्यात आलं. यामुळे क्रिकेट रसिक आणि रोहित शर्माचे चाहते नाराज झाले आहेत. चाहते पांड्याच्या कामगिरीवर राग राग करत असल्याचं अनेकदा पाहायला मिळतंय. पांड्याला मुंबई इंडियन्सचे चाहते हूटिंग करताना दिसत आहेत. रोहित शर्माचे कर्णधार पद काढून घेतल्यानंतर रोहित मुंबई इंडियन्स संघ सोडणार असल्याचं पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू वसिम अक्रम यांनी भाकीत केलं आहे. 

वसिम अक्रमने रोहित शर्माच्या फलंदाजीचे कौतुक केलं आहे. रोहितला आगामी सिझनमध्ये कोलकाताकडून खेळताना पाहायला आवडेल असं तो म्हणाला आहे. मला नाही वाटत की रोहित शर्मा हा मुंबईमधून खेळेल. मला त्याला गौतम गंभीरसोबत खेळताना पाहायचं आहे. केकेआरचा गंभीर मेन्टॉर असेल, श्रेयश अय्यर हा कर्णधार असेल आणि रोहित शर्मा हा सलामिवीर फलंदाज असेल, असं अक्रम म्हणाला आहे. 

कोलकातामध्ये रोहित शर्मा हा चांगली फलंदाजी करतो. म्हणून त्याला कोलकातामध्ये पाहणं हे चांगलं असेल. यंदाच्या हंगामात रोहितला म्हणावी अशी कामगिरी करत आली नाही. रोहित आणि इशानने चांगली सुरूवात केली. मात्र मिडल ऑर्डरवर खेळणाऱ्या खेळाडूंना मैदानावर ताबा मिळवता आला नाही.

सनरायझर्स हैदराबादने लखनऊचा पराभव केल्यानंतर मुंबई इंडियन्स हा संघ प्ले ऑफमधून बाहेर पडला आहे. यामुळे मुंबई इंडियन्सचे चाहते संघाच्या खेळीवर नाराज आहेत. आयपीएलमधून बाहेर पडणारा मुंबई इंडियन्स हा पहिलाच संघ आहे.

Post a Comment

0 Comments