बीड |
लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यामध्ये आली आहे. राज्यातील सर्वच मतदारसंघातील मतदान देखील पार पडले आहे.
प्रचाराच्या तोफा थंडावल्या असताना महाविकास आघाडीच्या उमदेवाराला निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. बीड लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदावार बजरंग सोनावणे यांना निवडणूक आयोगाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. त्याचबरोबर महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना देखील आयोगाने सूचना दिल्या आहेत.
बीड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सर्वत्र गाजली. महायुतीसह महाविकास आघाडीने बीडमध्ये जोरदार प्रचार केला. प्रचारासाठी सादर केलेल्या खर्चामध्ये तफावत आढळून आल्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणे यांना आयोगाने नोटीस बजावली आहे. निवडणूक अधिकारी दीपा मुधोळ यांनी सदर नोटीसचे आदेश काढले. बजरंग सोनावणे यांच्यासह त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार पंकजा मुंडे यांना देखील त्यांनी सूचना दिल्या आहेत. पंकजा मुंडे यांना अभिलेख सादर करुन तसापणी करुन घ्यावी आणि खर्चात तफावत राहणार नाही याची काळजी घ्यावी असे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले आहे
0 Comments