बीड |
जो स्वतःच्या मुलीला ग्रामपंचायत, नगरपंचायतमध्ये निवडून आणू शकत नाही. तो खासदारकीच्या निवडणुकीत काय करणार, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना लगावला.
सर्वांनी जोरदार कामाला लागा, मनात काही किंतुपरंतु ठेवू नका, पंकजा ताईचे काम जो जोरात करेल त्याचाच विचार मी विधानसभा निवडणुकीत करेल, असा इशारा देखील पवार यांनी महायुतीच्या स्थानिक नेत्यांना यावेळी दिला.
बीड लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे याच्या प्रचारार्थ आष्टी तालुक्यातील कडा येथील श्अमोलक जैन विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित सभेत ते बोलत होते. पुढे बोलताना पवार म्हणाले की, जिल्हाचा मागसलेपणा पुसून टाकण्यासाठी दळणवळण, पिण्यासाठी पाणी, शेतीसाठी पाणी, उद्योग व्यवसाय उभारून रोजगार उभा करण्यासाठी निधीची गरज असते. विकासासाठी राजकारणात थोड मागेपुढे सरकावे लागते. पण स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी कोणी काही बोलतो, आम्ही ९६ कुळी मग आम्ही काय ९२ कुळी आहोत का? आम्हालाही बोलता येते पण आम्ही तारतम्ये बाळगतो. दुध उत्पादकांचा पै ना पै तुमच्या खात्यावर जमा होईल. आपण सर्वांनी पंकजा मुंडे यांना मोठ्या मताने निवडून देण्याचे आवाहन पवार यांनी यावेळी केले.
0 Comments