सध्या देशाचं लक्ष हे लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे लागलं आहे. येत्या 4 जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. मात्र त्यापूर्वीच राज्याचं केंद्रस्थान असलेल्या पुण्यातून एक महत्वाची घडामोड घडली आहे. पुण्याचे जिल्ह्याधिकारी सुहास दिवसे हे एका वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.
पुण्याचे जिल्ह्याधिकारी सुहास दिवसे हे राजकीय प्रभावातून काम करत असल्याचा आरोप खेडचे प्रांताधिकारी आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी केली आहे. त्यामुळे जिल्ह्याधिकारी सुहास दिवसे यांची मतमोजणीआधी त्यांची बदली करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे जिल्हाधिकारी सुहास दिवसे हे खेड आळंदीच्या आमदारांच्या प्रभावाखाली काम करत आहेत असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. मात्र त्यांनी आमदारांचे थेट नाव घेतले नाही. परंतु खेड- आळंदी मतदार संघात अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते हे आहेत. त्यामुळे अप्रत्यक्षपणे त्यांच्या प्रभावातून जिल्हाधिकारी सुहास दिवसे काम करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
आहे.
जिल्हाधिकारी सुहास दिवसे हे अनेक वर्षे कृषी आयुक्त, पी एम आर डी ए चे संचालक, क्रिडा आयुक्त अशा विविध पदांवर काम करत पुण्यातच ठाण मांडून बसले आहेत. त्यासाठी दिवसे यांनी त्यांच्या राजकीय हितसंबंचा आधार घेतला असल्याचं बोललं जात आहे.
तसेच सुहास दिवसे हे निवडणूकीच्या काळात सतत खेड व आळंदीच्या आमदारांना भेटत होत असल्याचं आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या आमदारांचा जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांना त्यांच्या प्रशासकीय सेवेच्या सुरुवातीपासून पाठिंबा राहिला आहे. आगामी काळातील विधानसभा निवडणुका स्वतंत्र वातावरणात पार पाडण्यासाठी सुहास दिवसे यांची बदली होणे आवश्यक असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आता जोगेंद्र कट्यारे यांच्या पत्रानंतर निवडणूक आयोग काय कारवाई करणार हे पाहण देखील महत्त्वाचे असणार आहे.
0 Comments