बार्शी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कंदर येथील जॅकवेलची आमदार राजेंद्र राऊत यांनी केली पाहणी...


 बार्शी |

कंदर ते बार्शी पाणीपुरवठा करणार्या जॅकवेल पासून १००० ते १५०० फूट पाणी लांब गेले आहे ते पाणी जॅकवेल पर्यंत आणण्यासाठी आमदार राजेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली दुबार पंपिगचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.भीषण दुष्काळी स्थिती टाळण्यासाठी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आमदार राजेंद्र राऊत यांनी आवाहन केले आहे..

२६३ कोटी ४४ लाख रुपये नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम युद्ध पातळीवर सुरू असुन येत्या वर्षभरात काम पुर्ण होऊन बार्शीकरांना दररोज पाणी मिळणार असल्याचे आमदार राजेंद्र राऊत यांनी सांगितले..

यावेळी माजी नगराध्यक्ष रमेश पाटील, प्रशांत कथले, विलास आप्पा रेणके, सुधीर बारबोले, मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण तसेच बार्शी नगरपालिकेचे सर्व नगरसेवक,पत्रकार उपस्थित होते..

Post a Comment

0 Comments