राम सातपुते यांची ताकद वाढली, यांनी दिला त्यांना बिनशर्त पाठिंबासोलापूर |

सोनाई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष युवराज राठोड यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना विनाअट व बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. राठोड यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. यावेळी हत्तूर गावचे माजी सरपंच धर्मा राठोड, माजी उपसरपंच चंद्रकांत चव्हाण, राजू चव्हाण, नितीन चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दक्षिण सोलापूर विधानसभा निवडणूक लढवलेले, सोनाई फाउंडेशनचे अध्यक्ष, आधार हॉस्पिटलचे चेअरमन युवराज राठोड यांच्या राजकीय भूमिकेकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते, दरम्यान दक्षिण चे भाजप आमदार सुभाष देशमुख, काँग्रेस विधान परिषदेचे आमदार राजेश राठोड यांनी भेट घेतली होती.

शनिवारी मात्र आमदार तथा सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुते हे स्वतः युवराज राठोड यांना भेटायला त्यांच्या घरी गेले, बराच वेळ या दोघांमध्ये चर्चा झाली. त्यामुळे आता राठोड हे काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले होते, रविवारी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सातपुते यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

बिनशर्त पाठिंबा देण्यामागील कारण सांगताना ते म्हणाले, पोहरादेवी हे बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असून त्या पोहरादेवी गडाच्या विकासासाठी महायुती सरकारने 593 कोटीचा विकास आराखडा केला आहे, तसेच या सरकारने संत सेवालाल महाराज बंजारा तांडा समृध्दी योजना राबवली असल्याने समाज विकासाच्या प्रवाहात आला आहे.असे सांगत सोनाई फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, सदस्य, युवराज राठोड यांना मानणारा गट यांनी राम सातपुते यांना विजयी करावे असे आवाहन केले.

Post a Comment

0 Comments