....म्हणून मित्रानेच केली मित्राची हत्या



गोंदिया |

 शिल्लक कारणावरून वाद निर्माण होत वाद विकोपाला जाऊन मित्रानेच मित्राची हत्या केल्याची घटना शहरातील छोटा गोंदिया परिसरातील शास्त्री वार्डातील जितेश चौक येथे २३ मेच्या रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास घडली.राहूल दिलीप बिसेन (२२) रा. शास्त्री वार्ड गोंदिया असे मृत तरुणाचे नाव तर प्रतीक उर्फ सोनू सुनील भोयर (२३) रा. जितेश चौक, गोंदिया असे आरोपीचे नाव आहे.

गोंदिया शहर पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या छोट्या गोंदियाच्या जितेश चौकात २३ मेच्या रात्री ११.३० वाजताच्या सुमारास आरोपी प्रतीक व मृतक राहुल यांच्यात कुठल्यातरी कारणावरून वाद झाला. या वादात आरोपी प्रतीक याने राहुलच्या पोटावर, छातीवर, शरीरावर इतर ठिकाणी धारदार चाकूने वार करून त्याला जिवानिशी मारले.

 यानंतर त्याने घटनास्थळावरून पळ काढला. घटने संदर्भात मृतकाचे वडील दिलीप जीवनलाल बिसेन (४५) रा. शास्त्री वार्ड गोंदिया यांच्या तक्रारीवरून गोंदिया शहर पोलिसांनी आरोपी प्रतीक भोयरविरुद्ध भादंविच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.killed a friend घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम, पोलीस उपनिरीक्षक मंगेश वानखेडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी बानकर यांनी घटनास्थळावर दाखल होत पंचनामा करून प्रेत उत्तर येत बसण्यासाठी पाठवला. आरोपी फरार असून पोलीस आरोपीच्या मागावर आहेत.

Post a Comment

0 Comments