पंतप्रधानाचा उत्तराधिकारी कोण? स्वतः मोदीने दिले हे उत्तरदिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पतप्रधान करण्यासाठी मतं मागत असल्याचा आरोप केला.

कारण पुढील वर्षी 17 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 75 वा वाढदिवस असून 75 वर्षांवरील व्यक्ती निवृत्त होतील असा नियम त्यांनी केला होता. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमित शहांसाठी मत मागत असा दावा केजरीवालांनी केला. पण असं असलं तरी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा खरा उत्तराधिकारी कोण असणार अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:च उत्तर दिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रविवारी पश्चिम बंगालमधील हुगळी प्रचार सभा झाली. या सभेत भाष्य करताना नरेंद्र मोदींनी त्यांचा उत्तराधिकारी कोण असणार यावर उत्तर दिले. त्यानुसार, "पंतप्रधान मोदींचा वारस कोण? तुम्ही देशवासी आहात. तुम्ही माझे कुटुंब आहात. तुमच्याशिवाय या जगात माझे काहीही नाही. साधारणपणे, आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीला त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसाला काहीतरी देण्याची इच्छा असते. पण, तुम्ही सर्व देशवासी आहात, मोदींचे वारसदार आहात. तुम्ही माझे कुटुंब आहात आणि तुम्ही माझे वारस आहात. ज्याप्रमाणे कुटुंबप्रमुखाला आपल्या मुलांसाठी काहीतरी सोडावेसे वाटते, त्याचप्रमाणे मलाही विकसित भारत मागे सोडायचा आहे", असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

Post a Comment

0 Comments