बीड |
राज्यातील चौथ्या टप्प्यात मराठवाड्यातील हाय व्होल्टेज लढत असलेल्या बीड जिल्ह्यात प्रचारसभांचा धडाका सुरू आहे. बीडमध्ये पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे यांच्यात थेट लढत आहे.
मात्र, मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर असल्याने बीडमधील निवडणूक प्रतिष्ठेची बनली असून सांगता सभेसाठी दिग्गज बीडच्या मैदानात उतरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परळीत पंकजा यांच्यासाठी सभा घेतली. त्यावेळी, महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणेंवर हल्लाबोल केला. त्याच्या कारखान्यासाठी निधी देण्याचं काम मी केलं. कारखान्याची कपॅसिटी वाढवून दिली, असे अजित पवारांनी म्हटलं होतं. आता, बजरंग सोनवणेंनी अजित पवारांच्या टीकेला प्रत्त्युत्तर दिलं आहे.
बीडमध्ये बजरंग सोनवणेंच्या प्रचारार्थ सांगता सभेसाठी शरद पवार आवर्जून उपस्थित आहेत. येथील लोकसभा मतदारसंघात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष टोकाला गेल्याने यंदाच्या निवडणुकीत जातीय कार्ड महत्त्वाच ठरणार आहे. त्यातच, पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी आज अजित पवार व उदयनराजेंनी सभा घेऊन पंकजा मुंडेंना निवडून देण्याचं आवाहन केलं. यावेळी, धनंजय मुंडेंचा दाखला देत बजरंग सोनवणेंवर हल्लाबोल केला. आता, बजरंग सोनवणेंचीही जशात तसं उत्तर देत अजित पवारांवर पलटवार केला आहे.
0 Comments