सोलापुरात युवकाचा संशयास्पद मृत्यू, जुन्या भांडणाच्या रागातून घटना झाल्याची चर्चा

सोलापूर | 

बार्शी रोडवर मित्रांनी मिळून मित्रालाच गुरुवारी अज्ञात कारणाने मारहाण केली असून यात तोडकर वस्ती येथील लखन गायकवाड या २३ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की,यातील मयत युवकास मित्रांनी मिळून मागील भांडणाच्या कारणाने बार्शी रोडवरील एका स्थळी नेवून मारहाण केली. लखनला जबर मार लागला होता.यानंतर सदर मारहाण झाल्याची माहिती मयताच्या भावाला कळताच त्याने लखन यांस बाळे तोडकर वस्ती येथील घरी आणले. त्यावेळी त्याने जेवण करून झोपी गेले.काही वेळाने तो उठून आंग दुखू लागले असे सांगितला मात्र काही वेळातच लखनचा मृत्यू झाला.

याबाबत फौजदार चावडी ठाणे पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ मारेकऱ्यांचा शोध सुरु केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयांमध्ये नेण्यात आले आहे सध्या अज्ञात मारेकरी फरार आहेत.

Post a Comment

0 Comments