लोकसभा निवडणुकीसाठी शेवटच्या टप्प्यासाठी राज्यात येत्या २० मे रोजी मतदान पार पडणार आहे. त्याचा निकाल येत्या ०४ जूनला लागणार आहे. मात्र त्याआधीच आता विधानसभा निवडणुकीची राज्यात चर्चा सुरू झाली आहे.
लोकसभा निवडणुकीप्रमाणे राज्यात विधानसभा निवडणुकीत देखील महायुती विरूद्ध महाविकास आघाडी अशी लढत होण्याची शक्यता आहे. मात्र महाविकास आघाडीत पुढचा मुख्यमंत्री कोण होणार ? याबाबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठं भाष्य केलं आहे.
राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. यातच आता पुढच्या निवडणुकीत ठाकरेंच मुख्यमंत्री राहणार का ? यावर बोलतांना पृथ्वीराज चव्हाण यांनी उत्तर दिलं की, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा सर्वात मोठ्या पक्षाचा म्हणजे ज्या पक्षाच्या आमदारांची संख्या जास्त असते. त्या पक्षाचा होतो. जर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे जास्त आमदार निवडून आले तर त्यांच्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय.
0 Comments