चारच टप्प्यात भाजपला स्पष्ट बहुमत अमित शहा यांचा दावामुंबई |

लोकसभा निवडणूक एकूण सात टप्प्यात होणार आहे. आतापर्यंत त्यातील चार टप्पे पार पडले आहेत. अजून तीन टप्पे होणे बाकी असतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक मोठा दावा केला आहे. आम्हाला बहुमत तर मिळाले आहे, आता लढाई केवळ ‘चारसौ पार’ची आहे, असा ठाम विश्वास शाह यांनी व्यक्त केला आहे. 

पश्चिम बंगालमधील बनगाव येथील सभेत उपस्थितांना संबोधित करताना शाह यांनी हा दावा केला आहे. आतापर्यंत चार टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. म्हणजेच 380 जागांसाठी मतदान झाले आहे. त्यात पश्चिम बंगालमधील 18 जागा आहेत. या 380 जागांपैकी 270 जागा जिंकून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पूर्ण बहुमत मिळाले आहे. आता केवळ चारशे जागा जिंकण्याचे ध्येय शिल्लक आहे.

Post a Comment

0 Comments