वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर सोलापूरच्या बार्शीमध्ये स्थानिकांशी बोलत होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांनी घणाघाती टीका केली आहे. बार्शीतील लोकांना माझा आवाहन आहे की भाजपाला मत देऊ नका.
भाजपला मत दिले की तुमच्यावर धाडी पडल्या म्हणून समजा. नरेंद्र मोदी यांची सत्ता येण्यापूर्वी एका व्यक्तीवर 26 रुपये कर्ज होते. मात्र ते आता 96 रुपये झाले असे जागतिक बँक म्हणते आहे. दारुड्याची नोकरी गेल्यावर तो काय करतो? तर तो चोऱ्या, माऱ्या करतो, घरातले सामान विकतो. त्यामुळे दारुड्याची वृत्ती आणि मोदीची वृत्ती सारखीच आहे. पुढील पाच वर्ष मोदीला दिले तर देश कंगाल करून टाकेल, असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची सोलापूरच्या बार्शीमध्ये सभा झाली. उस्मानाबाद लोकसभेचे उमेदवार भाऊसाहेब आंधळकर यांच्या प्रचारार्थ बार्शीत जाहीर सभा झाली. बार्शीतील पांडे चौकामध्ये जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी आंबेडकरांनी मोदींवर निशाणा साधला.
0 Comments