धक्कादायक ! दारू सोडण्याचे औषध घेतल्याने दोघांचा मृत्यू


दारू सोडविण्याचे औषध पिऊन घरी आल्यानंतर अचानक प्रकृती बिघडल्याने दोघांचा मृत्यू झाला. तर दोघे अत्यवस्थ असल्याची घटना समोर आली आहे. ही घटना भद्रावती तालुक्यातील वडेगाव (गुडगाव) परिसरात घडली

अत्यवस्थ असलेल्या दोघांवर उपचार सुरू असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. सहयोग सदाशिव जीवतोडे (वय १९ वर्ष) व प्रतीक घनश्याम दडमल (वय २६, दोघेही रा. गुळगाव असे मृत तरूणांचे नाव आहे.

भद्रावती तालुक्यातील वडेगाव (गुडगाव) येथील काही तरूण युवकांना दारूचे व्यसन होते. ते व्यसन म्हणजे दारू पिणे सोडविण्यासाठी काल मंगळवारी चार युवक वर्धा जिल्यातील शेडेगाव येथे शेळके नामक वैद्याकडे गेले होते. तेथे चौघांनीही औषध प्राशन केले आणि आपल्या गावी परत आले. घरी परत आल्यानंतर अचानक सहयोग सदाशिव जीवतोडे (वय 19 ), प्रतीक घनश्याम दडमल (वय 26), सदाशिव पुंजाराम जीवतोडे (वय 45) व सोमेश्वर उद्धव वाकडे (वय 35) या चौघांची तब्बेत बिघडली. त्यामूळे त्यांना दवाखान्यात हलविण्यात आले. उपचारासाठी नेत असताना वाटेतच सहयोग सदाशिव जीवतोडे (वय 19 ), प्रतीक घनश्याम दडमल (वय 26), दोघांचा मृत्यू झाला. तर दोघांची प्रकृती अत्यवस्थ असून त्यांचेवार खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे.

भद्रावती पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी मृतदेह ताब्यात घेवून भद्रावती येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दाखल केले. मर्ग दाखल करण्यात आले घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.

Post a Comment

0 Comments