पोलीस निरीक्षक महिला हवालदार बरोबर गेली पळून


मुंबई |

पोलीस महानिरीक्षकांच्या (आयजी) कार्यालयात तैनातमहिला सहाय्यक उपनिरीक्षक (एएसआय) पोलीस शिपायासमोबत पळून गेली आहे. दोघे ड्यूटीवर जातो असे सांगून घरातून बाहेर पडले होते. मात्र ते कार्यालयात ह्युटीवरही हजर झाले नाहीत व घरीही परतले नाहीत

महिला एएसआयच्या नातेवाईकांनी पोलीस ठाणे गाठून ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली आहे. दोघांचे मोबाईलही बंद येत आहेत. महिला एएसआयच्या नातेवाईकांनी आयजी अरविंद सक्सेना यांची भेट घेऊन सांगितले की, त्यांची मुलगी व पोलीस शिपायामध्ये प्रेमसंबंध होते. दोघे लग्न करणार होते. मात्र दोघांची जात भिन्न असल्याने त्यांनी दोघांच्या लग्नाला परवानगी दिली नव्हती.

न सांगता ड्यूटीवर गैरहजर राहिल्याने दोघांनीही सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. आता पोलिसांना माहिती मिळाली आहे की, दोघांनी आर्य समाजात लग्न केले आहे. आयजीचे म्हणणे आहे की, जर दोघांना लग्न करायचे होते तर ते माझ्यासमोर येऊन सांगू शकले असते. त्यांना माहिती देऊ शकले असते. मात्र ड्युटीवर न सांगता गैरहजर रहायला नको पाहिजे होते. ग्वाल्हेर विभागाच्या आयजी कार्यालयात गेल्या पाच वर्षापासून महिला एएसआय निशा जैन आणि शिपाई अखंड प्रताप सिंह यादव तैनात आहेत

Post a Comment

0 Comments