कतरिनाच्या लंडनमधील व्हिडिओमुळे प्रेग्नेंसीच्या अफवा?


बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडपे कतरिना कैफ आणि विक्की कौशल हे सध्या लंडनमध्ये सुट्टीसाठी गेले आहेत. विक्की कौशलच्या वाढदिवसासाठी हे मोस्ट लव्हेबल कपल लंडनला सुट्टीचा आनंद घेत आहेत.

त्यांचे लंडनमधील फिरतानाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या या फोटोंमध्ये दोघे हातात हात घालून फिरताना दिसत आहे. मात्र, या फोटोत दिसणाऱ्या कतरिनाने सध्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे. एका व्हायरल व्हिडिओत कतरिना गरोदर असल्याचे दिसत आहे. या व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. पण असे काहीच नाही.

कतरिना कैफ गरोदर असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होत्या. मात्र, या सगळ्या अफवा असल्याचे समोर आले होते. मात्र आता कतरिना आणि विकीच्या लंडनमधील व्हिडिओवरुन पुन्हा एकदा या चर्चेला उधाण आलं. व्हिडिओ खूप दुरून शूट करण्यात आला आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये मात्र, असा दावा करण्यात आला की यात निरखून पाहिल्यास कतरिनाने आपल्या ओव्हरकोटमध्ये बेबी बंप लपवला. तर विकी एका केअरिंग नवऱ्याप्रमाणे तिची काळजी घेत होता. मीडिया रिपोर्ट्सनंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला.

Post a Comment

0 Comments