2029 भाजपचा कोण असेल पंतप्रधान पदाचा उमेदवार? अमित शहा यांनी नाव केले जाहीर



लोकसभा निवडणुकीसाठी आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. एकीकडे भाजप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात 2024 मध्ये तिसऱ्यांदा सरकार स्थापनेचा दावा करत आहे.

तर, दुसरीकडे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह  यांनी 2029 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

सध्याच्या लोकसभा निवडणुकीत, म्हणजेच 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत 400 पारचे लक्ष्य भाजपने ठेवले आहे. नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदाचे उमेदवार असून, त्यांच्याच चेहऱ्यावरच ही निवडणूक लढवली जात आहे. पण, आगामी काळात भाजपचे नेतृत्व कोण करेल, हा प्रश्न अनेकदा उपस्थित केला जातो. आता अमित शाह यांनी याबाबत सूचक वक्तव्य केले आहे.

हिंदी वृत्तवाहिनी एबीपीशी बोलताना अमित शाह यांनी 2029 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप कोणाच्या नेतृत्वात निवडणूक लढवणार, याबाबत माहिती दिली. शाह म्हणाले की, "नरेंद्र मोदी 2029 चा कार्यकाळ पूर्ण करतील आणि 2029 नंतरही भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक प्रचाराचे नेतृत्व नरेंद्र मोदीच करतील." याचाच अर्थ आगामी निवडणुकाही भाजप पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Post a Comment

0 Comments