मोहिते पाटील यांना चहा पाजायला माणसेही उरली नाहीत तानाजी सावंत यांची टीकासोलापूर |

माझी जीभ नेहमीच घसरते, अख्खा महाराष्ट्र जाणतो. जे वातावरण दिसत आहे, तस नाही. हा 1947 चा भारत नाहीये. 18 ते 29 वयोगटातील मतदार 70 टक्के मतदार आहे. त्याचा बुद्धिभेद कोणी करू शकत नाही.

जिल्हातील परिस्थिती बदलली आहे. देवेंद्र फडणवीस आपण एकदा माढ्यात येऊ पाहा किती परिस्थिती बदलली आहे. आज विरोधी उमेदवार धैर्यशील मोहीते यांना चहा पाजायला माणसं राहिली नाहीत अशी थेट टीका तानाजी सावंत यांनी यावेळी केली. तसंच, येथून सुमारे दोन ते सवादोन लाख मतांच लीड आपण देणार आहोत असंही सावंत यावेळी म्हणाले.

मोदी विरुद्ध पप्पू निवडणूक आहे. अकलूज बोले सोलापूर जिल्हा हाले ही अवस्था होती. आम्ही लहान होतो तेव्हा पाहात होतो", असे शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत म्हणाले. रणजित निंबाळकर यांच्या प्रचारार्थ माढामध्ये सभा पार पडली. यावेळी तानाजी सावंत बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री तानाजी सावंत, भाजप नेत्या रश्मी बागल, आमदार बबनदादा शिंदे उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments