२८७ धावा करूनही केवळ २५ धावांनी विजयी, दिनेश कार्तिकची वादळी खेळीमुंबई |

इनडियन प्रीमियर लीग २०२४ च्या ३० व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने (SRH) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) २५ धावांनी पराभव केला. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात हैदराबाद संघाने २८७ धावांची ऐतिहासिक धावसंख्या उभारली होती. प्रत्युत्तरात आरसीबीनेही २६२ धावांपर्यंत मजल मारली. पण त्यांना विजय मिळवता आला नाही.

हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना ट्रॅव्हिस हेडचे शतक आणि हेनरिक क्लासेनच्या अर्धशतकाच्या जोरावर २० षटकांत ३ बाद २८७ धावा केल्या. आयपीएलच्या इतिहासातील ही सर्वात मोठी धावसंख्या ठरली. प्रत्युत्तरात आरसीबीनेही शानदार फलंदाजी केली, परंतु लक्ष्य इतके मोठे होते की संघ २५ धावांनी मागे राहिला. आरसीबीला २० षटकात ७ विकेट्सवर केवळ २६२ धावा करता आल्या. दोन्ही संघांनी मिळून या सामन्यात एकूण ५४९ धावांचा पाऊस पाडला.

आरसीबीकडून दिनेश कार्तिकने ३५ चेंडूत ८३ धावांची खेळी केली. तर कर्णधार डू प्लेसिसने २८ चेंडूत ६२ आणि विराट कोहलीने २० चेंडूत ४२ धावा केल्या. सनरायझर्स हैदराबादकडून कर्णधार पॅट कमिन्सने ४३धावांत ३ बळी घेतले. तर मयंक मार्कंडेयने २ आणि टी नटराजनने १ बळी घेतला.

Post a Comment

0 Comments