मागच्या ७० वर्षात काँग्रेसने देशाची वाट लावली; पंतप्रधान नरेंद्र मोदी



धाराशिव |

 ही निवडणूक भारताच्या स्वाभिमानाची आहे. तुम्ही मागील 10 वर्ष पाहिली आहेत. जागाला आज तो भारत माहिती आहे, जो वेगाने विकास करत आहे. चंद्रयानची यशस्वी प्रक्षेपण, गगनयान जो पाठवण्याच्या तयारीत आहे, ज्याने कोरोनाची लस बनवली.

आधी असं कधी होत होत का? कमजोर सरकार मजबूत देश कसा बनवू शकेल?. आज भारत जगाला मदत करतो कुणाला भीक मागत नाही. विश्वासघात ही कॉँग्रेसची ओळख आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉँग्रेसवर थेट हल्ला चढवला.

धाराशिव लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचार सभेत पंतप्रधान बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार राणाजगजितसिंग पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

कॉँग्रेस आणि इंडिया आघाडीचे लोक शेतकऱ्यांसाठी मोठ मोठ्या बाता करतात. मात्र सत्ता काळात कॉँग्रेस ने शेतकऱ्यांना काहीही दिली नाही. आता शेतकऱ्यांना केवळ मदत करण्याची नाही तर आत्मनिर्भर बनवण्याची वेळ आहे. गरिबांच्या वाट्याला आलेला पैसा कॉँग्रेसच्या पंज्याने हिरावून घेतला, पण आता मोदी सरकार शेतकऱ्यांनी बनवलेले धान्य जगभरात निर्यात करता येणार आहे. कॉँग्रेस पक्ष आता पूर्णपणे कंगाल झालेला पक्ष आहे. स्वतः कॉँग्रेस पक्ष संपूर्ण देशात बहुमतासाठी आवश्यक 272 जागा लढवत नाहीये, मग ते सत्तेत कसे येणार? या फेक व्हिडिओ आणि खोट्याच दुकान चालवणाऱ्या कॉँग्रेसच खात आता बंद व्हायला पाहिजे. कारण कॉँग्रेस आता सत्तेत आल्यास मोठा कर लावणार आहे. कॉँग्रेसचे मनसुबे देशाला हानिकारक आहेत.

Post a Comment

0 Comments