शिवराज चाकुरकर यांच्या सुनबाईचा भाजपात प्रवेश, या मतदारसंघातील राजकीय गणिते बदलणार



मुंबई|

लातूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने यावेळी माला जंगम समाजातील डॉक्टर शिवाजी काळगे यांना उमेदवारी जाहीर केली, या उमेदवारीमुळे लिंगायत समाजाची मते आपल्याकडे वळतील ,लिंगायत समाजात सहानुभूती पसरेल अशी अटकळ काँग्रेसने बांधली होती.

मात्र उमेदवारी अर्ज भरण्याच्या आधीच माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्नुषा डॉ.अर्चना पाटील चाकुरकर यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे काँग्रेसचा हा आनंद औट घटकेचाच ठरला आहे.


लातूर जिल्ह्यातील निवडणुकीमध्ये लिंगायत ,मराठा हा वाद गेल्या ३० वर्षापेक्षा अधिक काळापासून आहे . १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत लातूर शहरातील बसवेश्वर पुतळ्याच्या वादामुळे कै.विलासराव देशमुख यांना निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता .लिंगायत समाजाचा प्रचंड रोष त्यांच्यावर होता .त्यानंतर प्रत्येक निवडणुकीत कमी अधिक प्रमाणात लिंगायत ,मराठा वाद हा उफाळत असतोचं.


आगामी विधानसभा निवडणुकीत डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांच्या प्रवेशामुळे वेगळीच गणित मांडले जाण्याची शक्यता आहे .लोकसभा निवडणुकीतही चाकुरकरांच्या प्रवेशामुळे सोलापूर ,धाराशिव ,लातूर ,नांदेड या चार लोकसभा निवडणुकीत याचा फायदा होईल अशी चर्चा भाजपच्या गोटात आहे.

Post a Comment

0 Comments