मुंबई येथे झालेल्या शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला यश.. तर पुन्हा मंत्रालयासमोर आंदोलन.. शंकर गायकवाड


बार्शी|  
 
 पिक विम्याच्या मागणीसह पाथरी तलावातील गाळ शेतकऱ्यांना नेण्याचा खंडित केलेला परवाना पुन्हा देण्यात यावा या मागणीसाठी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड यांचे नेतृत्वाखाली मुंबई येथील आझाद मैदानावर विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन केले, त्यावेळी अरुण गायकवाड, नितीन कदम, बापूसाहेब चौधरी, सचिन चौधरी, बाळासाहेब भायगुडे, रवींद्र गलांडे, दयानंद चौधरी, दया चौधरी, ज्ञानदेव गायकवाड, सचिन कदम, भैरवनाथ चौधरी, राजेंद्र भायगुडे, गणेश आगलावे, सागर चौधरी, अजित मते, सचिन मुंडे, नाना दराडे, सचिन दराडे, दादा शेळके, अभिजीत माळी, अक्षय डांगे, राजेंद्र फरताडे, उमेश ननवरे, श्रीकांत मुंडे, मनोज मते, विजय चौधरी, पांडुरंग गायकवाड, तात्या लोमटे आदींसह बहुसंख्य शेतकरी सहभागी झाले होते. 


बार्शी तालुक्यातील पाथरी येथील तलावामध्ये शेतकरी गाळ उपसून शेतामध्ये टाकत असत परंतु जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशामुळे गाळ काढण्याचे काम बंद करण्यात आले होते त्याविरोधात शेतकरी संघटना आज मंत्रालयासमोर आंदोलन करण्यासाठी गेली असता, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन आझाद मैदानावर सोडले व प्रश्न सोडवण्यासाठी मृद व जलसंधारण विभागाचे सचिव सुनील चव्हाण त्यांच्याशी बैठक घडवून आणली, लागलीच त्या बैठकीतून सचिव चव्हाण यांनी पुन्हा गाळ उपसण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देऊन तसे लेखी पत्र आंदोलकांना दिल्यामुळे हे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले असले तरी पुन्हा गाळ उपसण्यामध्ये कोणतीही अडचण आल्यास कोणतीही पूर्व सूचना न देता तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी शंकर गायकवाड यांनी दिला. आझाद मैदान पोलीस चौकीतील पोलिसांनी या आंदोलनाचा चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.


Post a Comment

0 Comments