बार्शीत महिलेची आर्थिक फसवणूक, बँकेत बनावट खाते उघडून पैशांचा अपहार



बार्शी |

ऑनलाईन फसवणुकीतील आर्थिक गुन्हे घडण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे. बार्शीतही, एका महिलेच्या महिलेच्या नावे बनावट खाते काढून त्यावर फिन्स फ्रेंड्स फायनान्स लिमिटेड कडून ऑनलाइन कर्ज काढून ते पैसे एका दुसऱ्याच अकाउंट वर ट्रान्स्फर करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे, इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेत हे बनावट खाते उघडण्यात आल्याचं पीडित महिलेने म्हटलं आहे.

सदर महिला व्यावसायिक कर्जासाठी आयसीआयसीआय बँकेत गेली असता तेथे सीबील स्कोरची तपासणी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याबाबत महिलेने बार्शीतील इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेत विचारणा केली असता तेथील कर्मचाऱ्यांकडून पीडित महिलेस उडवाउडवीची उत्तरे देण्यात आल्याचे महिलेने सांगितले. तसेच, त्या खात्यातून कोणत्या खात्यात पैसे ट्रान्स्फर करण्यात आले हे पाहण्यासाठी सदर अकाउंटच्या स्टेटमेंटची मागणी केली असता स्टेटमेंट देण्यासही बँकेने नकार दिला.

महिलेच्या आधार कार्डचा वापर करुन हे खातं काढण्यात आल्याचा संशय आहे. मात्र, मुळात आधार कार्डच्या केवळ झेरॉक्स किंवा फोटो वरून सदर आधार कार्ड हे संबंधित व्यक्तीचेच असल्याची तसेच सदर आधार कार्डला संलग्न असलेला मोबाईल नंबर संबंधित व्यक्तीचाच असल्याची शहानिशा न करता, बँकेत खाते कसे उघडण्यात आले? खात्यात पैसे डिपॉसिट होताना बँकेचे नियंत्रण नसते हे जरी मान्य केले तरी बँकेतून पैसे काढताना शहानिशा का करण्यात आली नाही? तसेच जर हे खाते त्या महिलेचेच आहे असे बँकेचे म्हणणे असेल तर बँक स्टेटमेंट देण्यास नकार का देत आहे? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. 

विशेष म्हणजे बँक खातेदाराला बँक स्टेटमेंट देणे हा खातेदाराचा (ग्राहक) अधिकार आहे. तरीही, इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेतील कर्मचारी आपली जबाबदारी झटकताना दिसून येतात.

Post a Comment

0 Comments