बार्शी |
सोलापूर जिल्ह्यामधील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 33 व्यक्तींचा जोशाबा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने जिल्हास्तरीय जोशाबा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये बार्शी येथील सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारे आणि गेल्या सहा वर्षांपासून निर्भीड, निधर्मी, निःपक्षपाती, सर्वसमावेशक पत्रिकारिता करणारे हिंदवी समाचार चे संपादक पत्रकार धिरज शेळके यांना पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन, पत्रकारिता क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा जिल्हास्तरीय 'दर्पणरत्न जोशाबा पुरस्कार' 2024 ने आज पंचायत समिती सभागृह, कुर्डुवाडी येथे दिग्गज मान्यवरांच्या हस्ते मानाचा फेटा, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन दिमाखदार पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र दास हे होते. तर दलित स्वयंसेवक संघाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप देवकुळे, भारतातील पाहिले तृतीयपंथी सरपंच माऊली कांबळे, जेष्ठ तमाशा कलावंत नंदा पाटोळे, वामन पाटोळे, गोविंद पाटोळे, संध्या माने, शिवसेना नेते अरविंद पवार, चिंचोलीचे सरपंच संतोष लोंढे, संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब देवकुळे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश आतकर यांनी केले आहे.
0 Comments