सोलापूर |
फिर्यादी छायाबाई प्रल्हाद चव्हाण,(वय-36),रा.पारधी वस्ती,कुंभारी,ता.द.सोलापूर यांनी वळसंग पोलीसात दिलेल्या फिर्यादीनुसार दि. 31 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 07/30 वाजण्याच्या सुमारास फिर्यादीची जाऊ यांना व त्यांच्या दोन मुलींना कुंभारी येथे राहणारे आप्पासाहेब बिराजदार,रोहित बिराजदार सागर तेली हे त्यांच्या घरामध्ये घुसुन छेडछाड करीत होते.फिर्यादी रोखण्यास गेले असता आरोपी रोहित बिराजदार यांने दगडाने मारल्याने फिर्यादीच्या उजव्या डोळ्याखाली जबर दुखापत झाली आहे.
आरोपी आप्पासाहेब बिराजदार,रोहित बिराजदार,सागर तेली,शिवानंद आंदोडगी,जी.जी.पाटील,कनु धपेकर,संतोष कुदरे,नागेश कुदरे,श्रीशैल माळी,आप्पा छपेकर,चनप्पा छपेकर,लिंगराज ख्यार्ड,चंदु रेडी,रामा आंदोडगी हे सर्वजण दोन्ही मुलींच्या अंगावरील कपडे फाडून छेडछाड करु लागले.त्यावेळी आवाज ऐकुन जवळ आलेली एका 14 वर्षीय मुलीला देखील रोहित बिराजदार व आप्पासाहेब बिराजदार यांनी उचलून घेवून तिच्या शरीरास स्पर्श करीत करित होते.सर्व आरोपींनी मिळून जातीवाचक शिवीगाळ देवून तु वेळोवेळी आमची बदनामी करतेस.आत्ता तुमच्या मुलींना उचलून नेतो असे म्हणून शिवीगाळ केली.फिर्यादीची जाऊबाई सरस्वती ही सोडविण्यासाठी आली असता तिच्या गळ्यातील सात ग्राम सोन्याचे गंठन हे शिवानंद आंदोडगी याने तोडून घेतले.तसेच पारधी कैम्प येथे इतर काही लोक हातामध्ये लाठ्या काठ्या,लोखंडी रॉड,लोखंडी पाईप घेवून दगडफेक करत सर्वांमा मारहाण करण्यास व दगडफेक करण्यास सुरवात केली.तसेच फिर्यादीच्या घरासमोरील मोटारसायकली रिक्षा,चारचाकी वाहनांची तोडफोड केली.पारधी कैम्प मधील लक्ष्मी मंदिरातील टिव्ही,साउंड व बल्व यांचे दगडफेक करून नुकसान केले.तसेच जवळपास तीस ते चाळीस घरांचे काचा खिडक्या दारे असे तोडफोड करून मोठे नुकसान केले आहे.तेरा जणांवर वळसंग पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास वळसंग पोलीस करीत असल्याची माहिती गुरुवारी पत्रकारांना देण्यात आली आहे.
0 Comments