करमाळा |
करमाळा बसस्थानकात एकूण ७१एसटी बस ची आवश्यकता आहे.सध्या केवळ आगारात ५८ बसच कार्यरत आहेत.त्यातील बहुतांश बसचे आयुर्मान संपल्याने त्यांचा वापर होत नाही.यामुळे बस संख्या मर्यादित झाल्याने अनेक मार्गावरील बसच्या फेऱ्या अचानक रद्द केल्या जात आहेत.त्यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रवाशांसह विद्याथ्र्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.त्यामुळे तातडीने आवश्यक वीस बस द्याव्यात अशी मागणी बागल गटाचे युवा नेते दिग्विजय बागल यांनी जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे
बागल यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ज्या मार्गावर प्रवासी संख्या आहे, तिथेच बसच्या फेऱ्या वाढवण्याचे धोरण ठेवले आहे.ऊपलब्ध असलेल्या बस जुन्या असल्याने कधी रस्त्यात बंद पडतात. तालुक्यातील अनेक मार्गावरील फेर्यां बंद करण्यात आल्या आहेत.यामुळे ज्येष्ठ नागरिक,महिला,विद्यार्थ्यांना प्रवासात सवलत असताना ही त्रास सहन करावा लागत आहे.
त्यामुळे सध्या आगारात कार्यरत असलेल्या बसची तात्पुरती दुरुस्ती न करता आवश्यक दुरुस्ती करुन सुस्थितीत आणाव्यात. आवश्यक असलेल्या२० बस आगारात दाखल करुन पूर्वी प्रमाणे तालुक्यातील सर्व मार्गावरील बस सेवा पूर्ववत करावी.त्यामुळे नागरीकांची समस्येपासून कायमस्वरूपी सुटका होणार आहे.याबाबत आपल्या स्तरावरुन योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी दिग्विजय बागल यांनी निवेदनाद्वारे केली आहे
0 Comments