गौडगाव येथे प्रेमाताई पाटील महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा


गौडगाव/प्रतिनिधी:

सौ. प्रेमाताई पाटील कला ,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नागोबा चौक गौडगाव येथे वीरपत्नी रोहिणीताई परमेश्वर काकडे व भारतीय सेनादलातील कार्यरत हवालदार नामदेव त्रिंबक पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.  

महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन बार्शी पंचायत समितीचे माजी सभापती बापूसाहेब बुरगुटे, लक्ष्मण संकपाळ धाराशिव पंचायत समितीचे उपसभापती, श्याम जाधव बार्शी मार्केट कमिटी संचालक व सोसायटी चेअरमन सुरेश घोडके उद्योजक दिनकर, जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. सर्व उपस्थित यांना गुरुवर्य के .टी. पाटील यांच्यावरील स्मरणिका भेट देण्यात आली.

स्वागत व प्रस्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य कुंडलिक महाराज पाटील यांनी केले. श्रीपतराव भोसले महाविद्यालय धाराशिव चे माजी प्राचार्य एस. एस .पडवळ अध्यक्षस्थानी होते. सद्गुरु दत्त महाराज देवस्थान झरेगावचे ह .भ. प. काका महाराज ह .भ. प. सुभाष महाराज गुंडगिरी ह .भ .प. बाळासाहेब महाराज कदम बोरगावचे मा.सरपंच राजेंद्र चव्हाण झरेगावचे सरपंच काकासाहेब संकपाळ, बाळासाहेब भड, सेनादलातील कार्यरत जवान निखिल देशमुख यांच्या मातोश्री, अविनाशजी डेंगळे सर  ,प्रभाकर भड, श्री देठे सर ,प्रयोगशील शेतकरी प्रशांत देशमुख ,पांडुरंग जाधव राजाभाऊ पाटील सामाजिक कार्यकर्ते राहुलजी भड, शैलेंद्र देशमुख इत्यादी उपस्थित होते. 


बापूसाहेब बुरगुटे यांनी  लोकशाही व भारतीय समाज याविषयी मनोगत व्यक्त केले.  महाविद्यालयातील  प्रा. डी .व्ही .जाधव प्रा. रवीना देशमुख महाविद्यालयाचे वरिष्ठ लिपिक दादाराव नागटिळक, लिपिक ओम घोडके, कर्मचारी धनराज पवार, अमोल जाधव तसेच विद्यार्थी व नागोबा चौकातील सर्व व्यापारी वर्ग उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments