सोलापूर | लग्नास नकार शाळेतून काढून टाकतो अशी धमकी दिल्यानंतर १९ वर्षीय मुलीची आत्महत्या


सोलापूर |

 प्रेमसंबंधानंतर लग्न करण्यास नकार दिल्याने आणि शाळेतून काढून टाकतो अशी धमकी दिल्याने कॉलेज मध्ये शिकणाऱ्या एका १९ वर्षीय मुलीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना होटगी रोडवरील शिवशाही शंकर नगरात १५ डिसेंबर २०२३ रोजी घडली आहे.

मयत ही मल्लिकार्जुन प्रशाला हत्तूरे वस्ती याठिकाणी शिकायला होती. या प्रकरणी दर्शन आगरखेड, त्याचे वडील आगरखेड सर, प्रशालेचे मुख्याध्यापक धर्याप्पा हत्तूरे, सुधाकर कामशेट्टी या चौघांवर मयत मुलीच्या वडीलाने गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादीची मुलगी व आरोपीत दर्शन यांचे प्रेमसंबंध होते व आयास भेटलेली होती त्यावेळी आरोपीत क्रं. १ याने मुलगी अस्मिता हिच्या सोबत लग्न करणार नाही आणि तुला बदनाम करुन तुझे जगणे मुश्किल करीन अशी धमकी देवून निघुन गेला होता ही बाब फिर्यादीची मुलगी हिने फिर्यादीच्या पत्नीस सांगितली होती. आरोपीत क्र. १ याने लग्नास नकार दिल्यामुळे फिर्यादीची मुलीने घरातील खोलीमध्ये जावून स्वतः गळफास घेवून आत्महत्या केली आहे. यातील फिर्यादीची मुलगी (मयत) शिकत असलेल्या शाळेचे मल्लिकार्जुन प्रशाला हत्तुरे वस्ती या शाळेचे संस्थापक आरोपी धन्ऱ्याप्पा हत्तुरे, आरोपी सुधाकर कामशेट्टी व आरोपी आगरखेड सर यांनी फिर्यादीच्या मुलीस तुला शाळेतुन काढून टाकतो व तुझी बदनामी करतो अशी धमकी देवुन शाळेत येण्यास बंदी घातली व आरोपीत क्रं. १ हा फिर्यादीची मुलगी हिचे सोबत लग्न करण्यास नकार दिल्याने व तिची बदनामी करण्याची धमकी दिली व तिला आत्महत्येस प्रवृत्त करुन तिचे मृत्युस कारणीभूत झाले आहे.

Post a Comment

0 Comments